रेल्वे स्टेशनवर महिलेवर आळीपाळीने केला गँगरेप, पतीला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 05:15 PM2022-05-01T17:15:18+5:302022-05-01T17:18:31+5:30
Gangrape Case : याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन आठवड्यात रेल्वे स्थानकात सामूहिक बलात्काराची ही दुसरी घटना आहे.
विजयवाडा - आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात तीन नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रेपल्ले रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन आठवड्यात रेल्वे स्थानकात सामूहिक बलात्काराची ही दुसरी घटना आहे.
प्रकाशम जिल्ह्यातील येरागोंडापलेम येथील स्थलांतरित कामगार तिच्या कुटुंबासह कृष्णा जिल्ह्यातील अवनीगड्डा येथे जात होते. त्यावेळी अवनीगड्डा येथे कोणतीही वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने त्यांनी शनिवारी रात्री आपल्या तीन मुलांसह स्टेशन परिसरात आश्रय घेतला.
सख्ख्या बहिणींवर बलात्कार, एका आरोपीने केली आत्महत्या, तर दुसऱ्या आरोपीने...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात प्रवेश केला आणि बाकावर झोपलेल्या महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पती तिच्या बचावासाठी गेला पण त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि तिला पहिल्या प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकाला नेले जिथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. नराधमांनी बेदम मारहाण केल्यानंतर पतीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार दार ठोठावूनही रेल्वे स्थानकातील पोलीस दरवाजे उघडत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी रेपल्ले शहर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. रेपल्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात हलवले.
बापटलाचे एसपी वकुल जिंदाल यांनी घटनास्थळी भेट देऊन स्वतः पाहणी केले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर रेपल्ले येथे निदर्शने करण्यात आली. टीडीपीचे पदाधिकारी अनगणी सत्य प्रसाद यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन केले. टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशात बलात्कारी लोकांचा शोध सुरू आहे. कारण राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे.
गुंटूर जिल्ह्यात दोन आठवड्यांच्या कालावधीत बलात्काराची ही चौथी घटना आहे. पहिली घटना पालनाडू जिल्ह्यातील गुराझाला रेल्वे स्थानकावर नोंदवली गेली. जिथे ओडिसातील एका कामगारावर सामूहिक बलात्कार झाला. पीडित महिला तिचा पती आणि तीन मुलांसह दोन दिवसांपूर्वी प्रकाशम जिल्ह्यातील वेंकटद्रीपुरम गावातून गवंडी काम शोधण्यासाठी गुंटूर जिल्ह्यात आली होती. ते गुंटूर-रेपल्ले पॅसेंजर ट्रेनने शनिवारी रात्री उशिरा रेपल्ले रेल्वे स्थानकावर उतरले होते. त्यांनी प्लॅटफॉर्मवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब झोपलेले असताना तीन अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पतीला उठवले, बाजूला ओढले आणि मारहाण केली. गोंधळ ऐकून महिलेला जाग आली आणि तिने हस्तक्षेप केला. दोन हल्लेखोरांनी महिलेला पकडून प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या बाजूला असलेल्या झुडपांच्या ढिगाऱ्याच्या मागे ओढले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पतीने रेपल्ले पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते.
दोन्ही आरोपींनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिला रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या तिची प्रकृती ठीक आहे. याप्रकरणी रेपल्ले रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी शोध पथके तयार करण्यात आली आहेत. रेपल्लेबाहेरील सर्व मार्गांवर चौक्या उभारण्यात आल्या असून वाहनांची तपासणी केली जात आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.