उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: March 25, 2023 04:18 PM2023-03-25T16:18:59+5:302023-03-25T16:19:56+5:30

उल्हासनगर माणेरेगाव येथील सागर भोईर याचे आकाश, आशिष, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्या सोबत काही कारणास्तव वाद झाला होता.

At Ulhasnagar a sword attack from an old grudge; A case has been registered against 8 persons | उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ माणेरेगाव दुर्गापाडा येथे राहणारा महेंद्र म्हात्रे यांचा मित्र सागर भोईर याला ओळखीच्या एका टोळक्याने जुन्या वादातून शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता बोलावून तलवारीने मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत.

उल्हासनगर माणेरेगाव येथील सागर भोईर याचे आकाश, आशिष, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्या सोबत काही कारणास्तव वाद झाला होता. शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता फोन करून महेंद्र म्हात्रे यांच्या सोबत सागर भोईर हे परिसरातील दुर्गापाडा येथे बोलावून घेतले. यावेळी आशिष, आकाश, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्यासह एकून ८ जणांनी महेंद्र म्हात्रे व सागर भोईर यांनी लोखंड रॉड, तलवारी यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: At Ulhasnagar a sword attack from an old grudge; A case has been registered against 8 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.