बिर्याणी खाल्ली अन् गळ्याला लावला दोर; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी बचावली! कारण अस्पष्ट

By संजय तिपाले | Published: May 16, 2024 10:36 PM2024-05-16T22:36:00+5:302024-05-16T22:36:21+5:30

आरमोरी शहर हादरले, मुलीवर ब्रम्हपुरीत उपचार सुरु

Ate biryani and put a rope around my neck boyfriend dead girlfriend saved The reason is unclear | बिर्याणी खाल्ली अन् गळ्याला लावला दोर; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी बचावली! कारण अस्पष्ट

बिर्याणी खाल्ली अन् गळ्याला लावला दोर; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी बचावली! कारण अस्पष्ट

संजय तिपाले, आरमोरी: भेटण्यासाठी ओळखीच्या महिलेच्या घरी अल्पवयीन मुलगी व तिचा प्रियकर एकत्रित आले.दोघांनी गप्पा मारल्या. मित्रांकिरवी हॉटेलातून मागवलेली बिर्याणी खाल्ली अन् त्यानंतर दोघांनीही एकाच दोरीने गळ्याला फास लावला. यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला तर प्रेयसी थोडक्यात बचावली. ही खळबळजनक घटना शहरातील बर्डी परिसरात १६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या घटनेमागील कारण अस्पष्ट आहे.

राहुल गजानन सावसागडे ( वय २०,रा. शिवाजी चौकाजवळ, आरमोरी) असे मयताचे नाव आहे. तो ट्रॅक्टवर मजुरी काम करायचा. त्याचे शहरातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. बर्डी परिसरातील एका महिलेच्या घरी दुपारी तीन वाजता ते भेटण्यासाठी एकत्रित आले. गप्पा मारल्यानंतर साडेचार वाजता राहुलने मित्राकरवी हॉटेलमधून बिर्याणी मागवली. दोघांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांनीही
त्याच खोलीत स्लॅबच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. यात राहुल सावसागडे याचा मृत्यू झाला तर प्रेयसी बचावली. दरम्यान, तिला तातडीने ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले असून सध्या उपचार सुरु आहेत. राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आकस्मिक मृत्यूची नोंद असून या घटनेमागील कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
.....
फोन न घेतल्याने मित्रांना संशय
दरम्यान, राहुल सावसागडे हा प्रेयसीसोबत असल्याची माहिती मित्रांना होती. साडेपाच वाजता मित्रांनी त्यास फोन केला असता त्याने कॉल घेतले नाहीत. त्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी बर्डी येथील महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला.
.....
खोली कशी काय दिली?
दरम्यान, आरमोरीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची प्रकरणे वाढल्याचे चित्र आहे. एका अल्पवयीन मुलीला तर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत लोटण्याचा प्रयत्न एका महिलेनेच केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आलेला आहे. या घटनेत अल्पवयीन मुलीसह तरुण प्रियकराला ओळखीतील महिलेने खोली उपलब्ध करुन दिल्याचे समोर येत आहे. खोली उपलब्ध करुन कशी दिली, या दृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Ate biryani and put a rope around my neck boyfriend dead girlfriend saved The reason is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.