अतिक अहमदचा शार्प शुटर अटकेत, घरातील भिंतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:15 PM2023-06-06T12:15:38+5:302023-06-06T12:24:30+5:30

सराय अखिल पोलीस ठाणे क्षेत्रातील भखन्दा उपरहार गावातील अब्दुल कवी हा माफिया डॉन अतीक अहमदचा शार्प शुटर आहे.

Atiq Ahmad's accomplice Ateeq, large cache of weapons seized from the wall of the house in UP | अतिक अहमदचा शार्प शुटर अटकेत, घरातील भिंतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

अतिक अहमदचा शार्प शुटर अटकेत, घरातील भिंतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

googlenewsNext

लखनौ - युपीतील राजू पाल हत्याकांडाचा आरोपी आणि काही दिवसांपूर्वी पत्रकारांच्या गर्दीत गोळ्या झाडून ज्याची हत्या करणारा कुख्यात अतिक अहमदशी संबंधित इतरही साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. राजू पाल हत्याकांडातील आरोपी अब्दुल कवी याच्या ३६ तास केलेल्या चौकशीत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली होती. तसेच, त्याने सांगितलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही ताब्यात घेतला आहे. रिमांडनंतर पोलिसांनी अब्दुल कवी यास लखनौच्या जिल्हा मध्यवर्ती तुरुंगात पाठवलं आहे. 

सराय अखिल पोलीस ठाणे क्षेत्रातील भखन्दा उपरहार गावातील अब्दुल कवी हा माफिया डॉन अतीक अहमदचा साथीदार आणि शार्प शुटर आहे. राजू पाल हत्याकांडात त्याचे नाव समोर आले होते. या आरोपानंतर गेल्या १८ वर्षांपासून अब्दुल कवि हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. मात्र, उमेश पालच्या हत्याप्रकरणानंतर पोलिसांनी अब्दुल कविच्या तपासाची मोहिम गतीमान केली होती. 

अब्दुलने उमेश पाल हत्याकांडातील आरोपींना त्याने शरण दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल कविवर १ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते. पोलिसांनी अब्दुलच्या घरावर छापा टाकला असता, घरातून मोठया प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी काही शस्त्रास्त्रे ही भिंतीत लपवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे, अब्दुलने ५ एप्रिल रोजी लखनौ सीबीआय कोर्टात आत्मसमर्पण केलं होतं. त्यावेळी अकल पोलिसांनी अब्दुल कविसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ ३६ तासांचीच पोलीस रिमांड दिली. या चौकशीत पोलिसांनी अब्दुल कविला अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. 

दरम्यान, या चौकशीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. त्यातूनच, भखिन्दा गावातून १० अवैध देशी कट्टे, ३१५ गोळ्या, १० अवैध देशी कट्टे १२ गोळ्या, ०१ रिवाल्वर ३२ बोर, ६६  जिवंत कारतूस ३१५ गोळ्या, २२ जिवंत कारतूस आणि १२ गोळ्या व २४ अदद देशी बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. 
 

Web Title: Atiq Ahmad's accomplice Ateeq, large cache of weapons seized from the wall of the house in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.