Atiq Ashraf Murder: 'आमच्या बाजारात गुंडगिरी केली तर गोळ्या घालू';अतिकची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांबाबत पाच मोठे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 02:58 PM2023-04-17T14:58:35+5:302023-04-17T15:06:01+5:30
Atiq Ashraf Murder: अतिक अहमद आणि अशरफवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Atiq Ashraf Murder: 'गुंडाई करोगे हमारे बाजार में तो गोली मारेंगे कपार में' फेसबुक पोस्टच्या या ओळी लवलेश तिवारीच्या आहेत. तो नेहमी या ओळी फेसबुकवर पोस्ट करत होता. पण, या ओळी अतिक अहमदच्या हत्ये संदर्भात असतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. या हत्येमुळे त्याने फेसबुकवर पोस्ट केलेल्या ओळी व्हायरल झाल्या आहेत.
अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना कॅमेऱ्यासमोर गोळ्या घालणाऱ्या शनी आणि अरुण मौर्याची गोष्ट सारखीच आहे, शनी दोन्ही हातांनी शूट करू शकतो. मात्र, तीनही वेगवेगळ्या शहरातील हे आरोपी एकमेकांच्या संपर्कात कशी आली आणि त्यांच्याकडे शस्त्रे कशी आली, याची अद्यापही माहिती पोलिसांनी मिळालेली नाही. सध्या तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनास्थळी आत्मसमर्पण केलेल्या या तीन हल्लेखोरांची एटीएस चौकशी करत आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना गोळ्या घालणारा लवलेश तिवारी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे 'महाराज' लावायचा, तो बंदुकीसह त्याचे फोटो पोस्ट करायचा, तर कधी गळ्यात कोब्रा घातलेला दिसत होता. 'आमच्या बाजारात गुंडगिरी केली तर थेट कापरात गोळी झाडू', असे त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते.
लवलेश कुटुंबाच्या संपर्कात नाही, परंतु त्याच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, तो नियमितपणे कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, असं त्याच्या वडिलांनी सांगितले. शनीनेच तुर्की पिस्तुलाने अश्रफवर पहिली गोळी झाडली. हा शूटर श्रीप्रकाश शुक्लाचा चाहता आहे, त्याने ९० च्या दशकात यूपीमध्ये माफिया राज सुरू केला होता, विशेष म्हणजे तीन आरोपींमध्ये शनी हा एकमेव आहे जो न चुकता दोन्ही हातांनी गोळी मारू शकतो. आठवीनंतर त्याने शिक्षण सोडले होते. शनि १० वर्षांचा असताना तो सायबर कॅफेमध्ये जाऊन गुन्हेगारांची माहिती गोळा करत होता, असं अनेकांनी सांगितलं.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करणाऱ्या या त्रिकुटातील अरुण मौर्य हे तिसरे नाव आहे. १८ वर्षीय अरुणला गावात कोणीही मित्र नाही. अरुणचे वडील दीपक पूर्वी पानिपतमध्ये मजूर म्हणून काम करायचे असे सांगितले जाते. १० वर्षांपूर्वी तो गावी परतल्यावर उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी विकू लागला. तो पानिपतमध्ये आपल्या वडिलांपासून वेगळा राहतो, तर त्याचे वडील कासगंजमधील एका गावात राहतात. सहा महिन्यांपूर्वी हाताला प्लास्टर करून अरुण शेवटचा गावी आला होता.
माफिया बंधूची हत्या करणाऱ्या या त्रिकुटात सहभागी असलेले लवलेश आणि शनी हे दोघेही तुरुंगात गेले आहेत. लवलेशने त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर स्वतःला बजरंग दलाच्या बांदा युनिटचा सक्रिय सदस्य म्हणून वर्णन केले आहे. बांदा युनिटचे अध्यक्ष अंकित पांडे यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.