एटीएम फोडणाऱ्यांना रायगड पोलिसांनी केले जेरबंद, एसीबी पोहोचली हरीयाणात
By निखिल म्हात्रे | Updated: December 16, 2022 17:57 IST2022-12-16T17:57:19+5:302022-12-16T17:57:28+5:30
मुंबई- नवी मुंबईला जवळ असलेला पेण परीसर गुन्हेगारीच्या नकाशावर येत असून येथील स्टेट बॅंकेचे एटीएम फोडून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरणारे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

एटीएम फोडणाऱ्यांना रायगड पोलिसांनी केले जेरबंद, एसीबी पोहोचली हरीयाणात
अलिबाग -
मुंबई- नवी मुंबईला जवळ असलेला पेण परीसर गुन्हेगारीच्या नकाशावर येत असून येथील स्टेट बॅंकेचे एटीएम फोडून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरणारे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. जानेवारीला घडलेल्या या गुन्ह्याने रायगड पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. परंतु स्थानिक गुन्हे
अन्वेषन विभागाने अथक प्रयत्न करून परराज्यातील चोरट्यांना अटक केले.
१७ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्रीच्या ही घटना घडली होती. चोरट्यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपयांची रुपयांची रोकड लंपास केली होती. तेव्हापासून या आरोपींचा शोध सुरु होता. अनेक प्रयत्न करूनही गुन्ह्यातील सापडत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांच्या पथकांनी खबऱ्यांमार्फत माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले होते.
याच तपासा दरम्यान हरीयाणातील तावडू पोलीस ठाण्यात एका दरोड्याच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक माहिती मिळाली. या दोघांचा पेण येथील एटीएम चोरी प्रकरणात सहभाग असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला मिळाली, त्यांनी तात्काळ एक पथक हरियाणा येथे रवाना केले. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता. त्यांनी एटीएम चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे कबुल केले. यानंतर वसिम अकरम अख्तर हुसेन, माजीद जुम्मा खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत या प्रकरणातील आणखिन दोन आरोपी निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी हसन खान, साकीर अब्दुल रहीम खान या दोघांना अटक केली. हे सर्वजण हरियाणामधील पुन्हाना तालुक्यातील रहिवाशी आहेत.