एटीएम फोडणारे हरियाणातील दोघे जेरबंद, मुख्य संशयित फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 08:06 PM2020-08-05T20:06:51+5:302020-08-05T20:07:14+5:30
महामार्गाला लागून असलेले एटीएम १२ जुलै रोजी चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली होती.
जळगाव : शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणाºया दोघांना हरियाणा पोलिसांनी पकडले असून या दोघांना ताब्यात घेण्याच्या दहा मिनिटे आधीच मुख्य संशयित फरार झाला आहे. दरम्यान, या दोघांना जळगावपोलिसांनी फरीदाबादमधील निमका कारागृहातून हस्तांतर करुन ताब्यात घेऊन बुधवारी शहरात आणले. निसार शफुर सैफी (३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (२९) रा. पलवल हरीयाणा अशी दोघांची नावे असून तिसरा मुख्य सुत्रधार कुरशीद मदारी सैफी (रा.अंघोला ता.पलवल, हरीयाणा) हा फरार आहे.
महामार्गाला लागून असलेले एटीएम १२ जुलै रोजी चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या
संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन
पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला, कोरोनामुळे आझम पटेल यांचं निधन