एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 03:45 PM2020-09-21T15:45:08+5:302020-09-21T15:45:38+5:30

पाथर्डीफाटा : बीट मार्शलची सतर्कता

ATM looted plan unsuccessful, four minors detained | एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

Next
ठळक मुद्देपोलिसांनी वेळीच पाठलाग करुन 4 संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

 इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल दिनेश पाटील व किसन गिधाडे हे रात्रीच्या गस्तीवर होते. पाथर्डी फाटा येथील ॲक्सिस बँकेचे एटीएमजवळ असलेले क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास गेले असता त्यावेळी एटीएममधून दोन संशयित इसम त्यांना पाहून पळाले, त्यामुळे बीट मार्शल यांनी एटीएममध्ये जाऊन बघितले असता एटीएम यंत्राची तोडफोड झाल्याचे लक्षात आले, त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर व पोलीस कंट्रोल रुमला माहिती कळवून अधिक मदत मागितली. संबंधित संशयित आरोपीचा बीट मार्शल ने पाठलाग सुरु केला. तोपर्यंत इंदिरानगर गुन्हे शोध पथकसुद्धा संशयित आरोपींच्या मागावर लागले होते. त्यावेळी वासननगर येथील एका गार्डनलगत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या आडोश्याला एक संशयित लपल्याचे बिट मार्शल यांच्या लक्षात येताच त्यांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले.


  

आढळून आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे,  गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, अखलाक शेख, संदीप लांडे, जावेद खान आदींनी परिसरात शोध घेत त्या संशयित आरोपीचे साथीदार आरोपी रुपेश शिवाजी कहार (21, अंबड) यास खाकीचा हिसका दाखवून विचारपूस केली असता त्याने उर्वरित चार संशयित आरोपींची नावे सांगितले तातडीने गुन्हे शोध पथकाने अवघ्या दीड तासात त्या संशयित चार मुलांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना पोलिसांनी चौकशी केली असता ते सगळे अल्पवयीन असल्याचे समोर आले. संशयित आरोपींकडून एटीएम फोडायचे हत्यार, हातोडा, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

 

Web Title: ATM looted plan unsuccessful, four minors detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.