गुजरातमध्ये तीन मुलींवर अत्याचार, 'गुड टच-बॅड टच' शिकताना घटना उघडकीस
By महेश गलांडे | Published: October 9, 2020 07:45 AM2020-10-09T07:45:25+5:302020-10-09T07:48:12+5:30
याबाबत डीसीपी लखधीरसिंग झाला यांनी माहिती देताना म्हटले की, शाळेतील मुलीने सर्वप्रथम आपल्या शिक्षिकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.
वडोदरा - हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात धक्कादायक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका इसमाने तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाळकरी मुलींना चॉकलेटचे अमिष दाखवून हा नराधम चिमुकल्या मुलींवर अत्याचार करत होता. वडोदरा जिल्ह्यातील मकापुरा येथील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत डीसीपी लखधीरसिंग झाला यांनी माहिती देताना म्हटले की, शाळेतील मुलीने सर्वप्रथम आपल्या शिक्षिकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यावरुन, ही घटना उघडकीस आलं आहे. शिक्षकांकडून 'गुड टच आणि बॅड टच' चे धडे शिकवत असताना, या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग शिक्षकांना सांगितला. त्यानंतर, पीडित मुलीच्या पालकांना बोलावून घेत शिक्षकांनी नराधमाच्या कृत्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी, पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, आणखी दोन मुलींवर बलात्कार केल्याचेही सांगितले. चॉकलेटचे अमिष दाखवून आपण तीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोपीने मान्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली आहे.
On being informed, police arrested the accused who confessed to having committed the crime against two other minor girls. The man would call girls to his home on the pretext of giving them chocolates and sexually assault them: Vadodara DCP Lakhdheersinh Zala (08.10) https://t.co/8v7nWI6Mc4
— ANI (@ANI) October 9, 2020
दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातूनच, देशभरातील अनेक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत.