शितपेयात गुंगीचे औषध टाकून विवाहितेवर बॅंकेतच अत्याचार, बॅंक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:51 PM2021-02-15T23:51:52+5:302021-02-15T23:52:29+5:30
Crime News : पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली.
जळगाव : कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या ३८ वर्षीय महिलेवर बॅंक व्यवस्थापकाने सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केला. त्याशिवाय महिलेचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी देत पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडून तीन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सिताराम शर्मा (रा. मुंबई) याच्याविरुद्ध कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी सोमवारी रात्री याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अत्याचार व अॅक्ट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान कर्ज योजनेची माहिती घेण्यासाठी ही महिला मैत्रीणीसह शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या शाखेत गेली. यावेळी तेथे व्यवस्थापक शर्मा याने त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. यानंतर १५ दिवसांनी महिलेस सुटीच्या दिवशी बँकेत बोलावले. बँकेत कोणीही नसल्याची संधी साधत शर्मा याने महिलेस शितपेय पिण्यास दिले. पिल्यानंतर महिलेस गुंगी आली होती. यांनतर त्याने बँकेतच त्यांच्यावर अत्याचार केला. आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तयार केले. महिला शुद्धीवर आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी देताच त्याने देखील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर संबधित महिलेस वेळोवेळी फोन करुन त्रास देणे सुरूच ठेवले. महिला नाशिक येथे गेलेली असताना फोटो, व्हिडीओ देण्याच्या बहाण्याने शर्मा देखील तेथे गेला. नाशिकमधील एका लॉजमध्येही आठ वेळा अत्याचार केलेे.
घटस्फोट घ्यायला भाग पाडले
हा प्रकार वाढत चालल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न केला.परंतु, यानंतर शर्मा याने तिला लग्नाचे आमीष दिले. त्यासाठी महिलेस घटस्फोट घेण्यास भाग पाडले. शर्माच्या सांगण्यावरुन महिलेने घटस्फोटही घेतला. पण शर्मा याने लग्न केले नाही. याउलट महिलेच्या पतीस पत्र पाठवून तीची बदनामी केली. महिलेस जीवेठार मारण्याची धमकी दिली. जातीवाचक शिवीगाळ करुन तीला अपमानीत केले. अखेर या पिडीत महिलेने सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा तपास करीत आहेत