ठाण्यात पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार, पुणे पोलिसांकडे वर्ग होणार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:42 AM2021-08-06T09:42:32+5:302021-08-06T09:46:54+5:30

Crime News: लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय पोलीस महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश पाटील (२६) या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला.

Atrocities on police woman in Thane by police, case will be handed over to Pune police | ठाण्यात पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार, पुणे पोलिसांकडे वर्ग होणार प्रकरण

ठाण्यात पोलीस महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार, पुणे पोलिसांकडे वर्ग होणार प्रकरण

Next

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय पोलीस महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रितेश पाटील (२६) या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण पुण्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केले जाणार आहे.
मुंबईतील विक्रोळी येथे वास्तव्याला असलेल्या रेल्वे पोलीस दलातील पीडित महिला पोलिसाची ओळख ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल रितेशबरोबर झाली होती. याच ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्याने तिला लग्न करण्याचेही आमिष दाखविले. यातूनच सुरुवातीला १६ जुलै रोजी पुण्यातील वडगाव येथील एका परिसरात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर २२ जुलै रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथील सारंग हेरिटेज लॉज येथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. अखेर या पीडितेने रितेश याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक केल्याची तक्रार ४ ऑगस्ट रोजी दाखल केली. या प्रकाराची सुरुवात मावळ भागातून झाल्याने हे प्रकरण मावळ पोलिसांकडे वर्ग केले जाणार असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

Web Title: Atrocities on police woman in Thane by police, case will be handed over to Pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.