दोन चिमुकलींवर युवकाचा अत्याचार, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 21:02 IST2020-08-09T21:01:58+5:302020-08-09T21:02:30+5:30
याप्रकरणी पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे.

दोन चिमुकलींवर युवकाचा अत्याचार, आरोपीस अटक
वर्धा : शहरालगतच्या सिंदी (मेघे) परिसरात अंगणात खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर एकाच आरोपीने जबरी अत्याचार केल्याची घटना रविवारी तक्रारीअंती उघडकीस आली. याप्रकरणी पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे.
स्नेहल उर्फ छोटू पुरुषोत्तम मून (२४) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ६ ऑगस्टला दुपारी १२ वाजताच्या सुमारास ७ आणि ९ वर्षीय दोन चिमुकल्या घराशेजारच्या अंगणात खेळत होत्या. पिडितांचे आई-वडील घरी नसल्याची संधी साधून आरोपीने प्रारंभी सात वर्षीय चिमुकलीला तिच्या घरात नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर लगेच त्याच घरात ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाला.
आई-वडील घरी आल्यानंतर चिमुकल्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यावर रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी स्नेहल मून याला अटक केली आहे.