न्यायालयाच्या आदेशानुसार चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:56 PM2019-02-12T13:56:19+5:302019-02-12T14:00:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमावेळी आरोपींनी कार्यक़्रम बंद पाडण्यासाठी गोंधळ घातला. संस्थाचालक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली होती.
पिंपरी : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय पुणे येथे दाखल असलेल्या खासगी फौजदारी दाव्याच्या संदर्भाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी तीन महिला आणि एक पुरूष यांच्याविरोधात सोमवारी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ यादव थरकुडे आणि तीन महिला अशा चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रखमाई चिंचवडे बालक मंदिराच्या संचालिका असलेल्या महिलेने अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा खासगी दावा दाखल केला होता. शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमावेळी आरोपींनी कार्यक़्रम बंद पाडण्यासाठी गोंधळ घातला. संस्थाचालक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने सीआरपीसी कलम १५६ (३) नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चिंचवडेनगर येथील आरोपींविरूद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.