सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 22:25 IST2020-06-19T22:20:26+5:302020-06-19T22:25:24+5:30
उत्तर प्रदेश एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिहादसाठी लोकांना भडकवत होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक
उत्तर प्रदेश पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. लोकांना जिहादसाठी उद्युक्त करणारा मोहम्मद इनामुल हक याला उत्तर प्रदेश एटीएसनेअटक केली आहे. त्या व्यक्तीला बरेली येथून अटक करण्यात आली आहे. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिहादसाठी लोकांना भडकवत होता. अखेर यूपी एटीएसने त्याला बरेली येथून अटक केली. मोहम्मद शोएब उर्फ अबू मुहम्मद अल हिंदी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यूपी एटीएस दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या व्यक्तीकडून अल कायदाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. यूपी एटीएसने सांगितले की, अशी माहिती मिळाली की शोएब पूर्णपणे कट्टरपंथीय आहे आणि दहशतवादी संघटनेत युवकांना प्रवृत्त करून त्यांना भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे. यूपी एटीएसने केलेल्या चौकशीत आणि त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून असे दिसून आले की, इनामुल जिहादी विचारधाराने प्रभावित आहे. यासह, तो इतर लोकांना जिहादसाठी प्रवृत्त करण्याविषयी देखील बोलतो. यावर अनेक कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण
Shushant Singh Rajput : सावधान! सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा असे प्रकार घडल्यास चित्रपट होऊच देणार नाही, मनसेचा इशारा
Shushant Singh Rajput : १५ वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या, तिच्या डायरीत असे लिहिले होते सुशांतबद्दल