मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 03:09 PM2020-09-09T15:09:03+5:302020-09-09T15:11:24+5:30

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात  भा.दं.वि कलम 452, 448, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ संशयित इसमांना तात्काळ शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ATS arrested three Reiki practitioners at Chief Minister Uddhav Thackeray's farmhouse | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपासात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी अलीकडेच आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांना देखील धमकीचे कॉल येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे.  न्यायालयाने त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली. अनुज कुमार, यशपाल सिंग, प्रदीप धनावडे अशी त्यांची नावे असल्याचे बोलले जाते. काहीच दिवसांपूर्वी मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा चांगल्याच सतर्क झाल्या. ठाकरे फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


खालापूर तालुक्यातील भिलवले भागात उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टुरिस्ट कारने आलेल्या तीनजणांनी बंगल्याची रेकी केली. फार्महाऊसच्या दिशेने निघालेल्या सुरक्षारक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, ड्युटीवर आलेल्या सुरक्षारक्षकापाठोपाठ हे तरुण तिथे पोहोचले आणि माहिती असूनही खोटे का सांगितले?” असे विचारत तक्रारदार सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप आहे.

बंगल्याची पाहणी करुन तिघेजण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीने कारवाई करत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून या तिघांची एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपासात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे रविवारी समोर आले होते. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुबईवरुन शनिवारी रात्री 2 वाजता मातोश्रीवर फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र, कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे. त्यानंतर शरद पवार यांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर कंगनाविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही 9 ते 10 वेळा धमकीचे फोन आले. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 फिर्यादी यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलीस ठाण्यात  भा.दं.वि कलम 452, 448, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ संशयित इसमांना तात्काळ शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काईंगडे हे करीत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

 

Web Title: ATS arrested three Reiki practitioners at Chief Minister Uddhav Thackeray's farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.