एटीएसची मोठी कारवाई; ५३ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 08:35 PM2019-09-10T20:35:46+5:302019-09-10T20:37:03+5:30

पाचजणांना अटक

ATS major action; 53 crore worth of MD seized | एटीएसची मोठी कारवाई; ५३ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त

एटीएसची मोठी कारवाई; ५३ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त

Next
ठळक मुद्दे अमली पदार्थाविरोधातील एटीएसएची ही गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.एमडी हे तंत्रज्ञान व अत्यंत उच्च दर्जाचे रसायन वापरुन बनविण्यात आलेले आहे.

मुंबई - मुंबई व राज्यातील अन्य प्रमुख शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पर्दाफाश केला आहे. पाच तस्करांना अटक करुन त्यांच्याकडून तब्बल १२९ किलो मेफिड्रिन (एमडी) जप्त केले आहे. अमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात त्याती किंमत तब्बल ५२ कोटी ६४ लाख ९४ हजार इतकी आहे. अमली पदार्थाविरोधातीलएटीएसएची ही गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
जितेद्र पर्मात (३६) अब्दुल रझाक शेख (वय ४७), इरफान शेख (४३), सुलेमान शेख (२८), नरेश मस्कर (४४), अशी या तस्कराची नावे असून या टोळीत आणखी काही साथीदार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. एटीएसच्या विक्रोळी कक्षातील संदीप विश्वासराव, अनिल ढोले यांना एमडी विकण्याकरीता काहीजण दुतग्रती महामार्गावरील भांडूप येथील एका बस स्टॉपजवळ सोमवारी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून एका गाडीतून आलेल्या दोघाजणांना पकडले. त्यांच्याकडील झडतीत ९ किलो एमडी मिळून आले, अब्दुल शेख व इरफान असे नाव असलेल्या दोघाकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई व अन्य ठिकाणी विक्रीसाठी आणखी एमडी असल्याचे सांगितले. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पथकाने त्यांच्या तिघा साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडे १२० किलो एमडी मिळाले.
एमडी हे तंत्रज्ञान व अत्यंत उच्च दर्जाचे रसायन वापरुन बनविण्यात आलेले आहे. बनविण्यात येत असलेला कारखाना व वितरित केलेल्या अन्य ठिकाणी शोध मोहीम सुरु असून अमली पदार्थ विक्री करणारे हे देशातील मोठे रॅकेट आहे, असे एटीएसचे प्रमुख देवेन भारती, उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे, उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.

४० लाखाला एक किलो एमडी
एटीएसने जप्त केलेले एमडीची अंमली बाजारपेठेत एक किलोला सरासरी ४० लाख रुपये घेतले जातात, उच्च दर्जाचे रासायनिक वापरुन बनविण्यात आल्याने त्याला मोठी मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: ATS major action; 53 crore worth of MD seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.