मोठी कारवाई; तीन एके-४७ रायफलींसह ड्रग्ज साठा जप्त
By पूनम अपराज | Published: September 30, 2019 02:41 PM2019-09-30T14:41:02+5:302019-09-30T14:43:22+5:30
या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मुंबई - मनोर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आज पालघरमध्ये शस्त्राचा मोठा साठा जप्त केला आहे. पालघरच्या मनोर भागात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये तीन एके - ७ रायफल्स आणि ड्रग्सचा मोठा साठा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही कारवाई मनोर पोलिसांनी केली असून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
मनोर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिल्हार फाटा येथील ओव्हर ब्रिजच्या बाजूस असलेल्या हिंदुस्थान ढाबा परिसरात काही इसम अमली पदार्थ आणि शस्त्रांसह येणार असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने सापळा रचून काल ६ वाजताच्या सुमारास आरोपी प्लास्टिकची वजनदार गोणी घेऊन आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील गोणीची झडती घेतली. त्यावेळी ४ गावठी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, ६३ जिवंत काडतुसे, ३ भारत सरकारने प्रतिबंधित केलेले गावठी बनावटीचे एके - ४७, ८ किलो ९०० ग्रॅम इफ्रेडीन, ८ किलो ५०० ग्रॅम डीएमटी, ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर, ३ किलो ९०० ग्रॅम डोडो मार्फिन हे अमली पदार्थ आणि मोबाईल हँडसेट असा एकूण १३ कोटी ६० लाख ९९ हजार ९०० रुपये किंमतीचा पोलिसांनी जप्त केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यातच घातपात टाळण्यासाठी पोलीस सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली असतानाच ही कारवाई काही महत्वाचे धागेदोरे शोधून काढण्याची शक्यता आहे. गुजरात समुद्रमार्गे दहशतवादी दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असून आणखी काही महत्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात गुजरातमधील कांडलामध्ये कच्छमार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली होती. या माहितीनंतर सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून समुद्रमार्गे येत हे कमांडो किंवा दहशतवादी धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा किंवा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली होती. यामुळे देशासह राज्यातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येत आहे.
पालघर - मोठी कारवाई; तीन एके-७ रायफली जप्त
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2019
https://t.co/CbvSFUjpi9