‘त्या’ दहशतवाद्यांचा ताबा घेणार एटीएस; नांदेड, मनमाड, नवी मुंबईत सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:37 AM2022-05-12T10:37:51+5:302022-05-12T10:38:03+5:30

नांदेड आणि आदिलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे  पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ATS to take custody 'those' terrorists; Special attention of security agencies in Nanded, Manmad, Navi Mumbai | ‘त्या’ दहशतवाद्यांचा ताबा घेणार एटीएस; नांदेड, मनमाड, नवी मुंबईत सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर

‘त्या’ दहशतवाद्यांचा ताबा घेणार एटीएस; नांदेड, मनमाड, नवी मुंबईत सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाच्या ४ हस्तकांना कर्नालमधून अटक करण्यात आली होती. रिंदा हा पाकिस्तानातून भारताविरोधात दहशतवादी कट रचत असल्याचा धक्कादायक खुलासा तपासातून झाला होता. याबाबतच्या अधिक तपासासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथक या चार  हस्तकांचा ताबा घेणार आहे, तसेच महाराष्ट्रातील नांदेड, मनमाड आणि नवी मुंबईसारख्या भागांवर सुरक्षा यंत्रणांची विशेष नजर आहे.

खलिस्तानी दहशतवादी रिंदानेच तेलंगणामध्ये स्लीपर सेलच्या मदतीने आरडीएक्स पाठविले असल्याची  धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली होती.  हे आरडीएक्स नांदेडमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती सुरुवातीला होती, पण पुढे हे आरडीएक्स तेलंगणामध्ये पाठविण्यात आले होते. हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून बीएसएफच्या जवानांनी मंगळवारी ४ दहशतवाद्यांना अटक केली.

गुरुप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर अशी त्यांची नावे असून,  चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदिलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे  पोलीस तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अटकेनंतर महाराष्ट्र पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.  या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंह रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी महाराष्ट्र एटीएस अटकेत असलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेणार आहे. 

 स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण
 या तिन्ही भागांत खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या मदतीने लोकांचे ध्रुवीकरण करत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  नांदेडपासून पंजाबपर्यंत अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे स्लीपर सेल तरुणांना खलिस्तानी अजेंड्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या एका तरुणावरही यंत्रणांची नजर असल्याची माहिती समजते आहे. हा तरुण ख्रिश्चन कुटुंबातील असून, तो शीख धर्माचा प्रचार करत आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान या तरुणाने नवी मुंबईतील अनेकांना आपल्यासोबत दिल्लीला नेले होते, असाही आरोप आहे. याबाबतही एटीएसकडून अधिक  तपास सुरू आहे.a

Web Title: ATS to take custody 'those' terrorists; Special attention of security agencies in Nanded, Manmad, Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.