वैभव आणि सुधन्वाची पार्सल बॉम्बप्रकरणी होणार चौकशी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:25 PM2018-08-13T15:25:45+5:302018-08-13T15:27:00+5:30

आजच्या छापेमारीत देखील एटीएसला शस्त्रसाठा सापडला तर सुधन्वाच्या घरातून  ६ हार्ड डिस्क आदी सामान जप्त 

ATS will investigate with Vaibhav and Sudhanswa about parcel bombs | वैभव आणि सुधन्वाची पार्सल बॉम्बप्रकरणी होणार चौकशी? 

वैभव आणि सुधन्वाची पार्सल बॉम्बप्रकरणी होणार चौकशी? 

googlenewsNext

मुंबई - पुण्यातील सरहद संस्थेचे संजय नहार यांना काही महिन्यांपूर्वीच पार्सलमधून बॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. हा पार्सल बॉ़म्ब नगर येथील कुरियर कंपनीच्या कार्यालयात फुटला होता. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी एटीएसकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच आणखी शस्त्रसाठा या दोघांकडून जप्त केला आहे. सुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातील घरातून ६ हार्डडिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. 

आज एटीएसने वैभव राऊतच्या घरी पुन्हा छापा मारला. यावेळी एटीएसने आठ पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि शस्रांचे अनेक सुटे भाग हस्तगत केले आहे. त्याशिवाय दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर आली आहे. सुधन्वाच्या घरातून एटीएसने ६ हार्ड डिस्क, लॅपटाॅप, नऊ मोबाईल, अनेक सीमकार्ड जप्त केले असून एक कार आणि मोटारसायकलही जप्त केली आहे. याआधी एटीएसने सुधन्वाच्या घरातून शस्त्रसाठा जप्त केला होता. इतका शस्त्रसाठा कशासाठी या दोघांनी केला होता याबाबत एटीएसने कसून चौकशी सुरू केली आहे. 

Web Title: ATS will investigate with Vaibhav and Sudhanswa about parcel bombs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.