माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 09:27 IST2021-06-28T09:23:23+5:302021-06-28T09:27:53+5:30
संदीप म्हात्रे असं माजी नगरसेविकेच्या पतीच नाव आहे.

माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न
नवी मुंबई: माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संदीप म्हात्रे असं माजी नगरसेविकेच्या पतीच नाव आहे. रविवारी रात्री कोपर खैरणे सेक्टर ६ येथील त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. ३ ते ४ जणांनी कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते थोडक्यात बचावले असून हाताला जखम झाली आहे. झटापट करून एकाला पकडले आहे. यापूर्वी देखील त्या मुलांनी म्हात्रे यांच्यावर हल्ला केला होता.