बाप लेकीवर गुन्हा दाखल, ऑनलाईन चलान दिल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 05:11 PM2020-12-17T17:11:05+5:302020-12-17T17:13:13+5:30

Attack On Traffic Police : या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

Attack on Khaki! Traffic police beaten up in anger over online challan | बाप लेकीवर गुन्हा दाखल, ऑनलाईन चलान दिल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण

बाप लेकीवर गुन्हा दाखल, ऑनलाईन चलान दिल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी बाप-लेकीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या समोर शहर वाहतूक विभागाची वाहनांची पाहणी आणि कारवाई दरम्यान वाहन परवाना व कागदपत्र जवळ नसल्याने ऑनलाईन चलन दिले. या रागातून वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी बाप-लेकीवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शहर वाहतूक शाखा उपविभाग विठ्ठलवाडी यांच्या वतीने वाहतूक पोलीस गणेश चौधरी हे बुधवारी सायंकाळी ७ वाजता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या सामोरील रस्त्यावर वाहनांची पाहणी व कायदेशीर कारवाई करीत होते. त्या दरम्यान ऍक्टिव्ह गाडीवर आलेल्या मनोज गुरुनानी यांच्याकडे वाहन परवाना व संबंधित कागदपत्र जवळ नसल्याने, ७०० रुपयाचे ऑनलाईन चलन दिले. याप्रकाराने गुरनानी व त्यांच्या सोबत असलेली त्यांची मुलगी संतप्त झाली. गेल्या आठवड्यात माझ्या भावालाही चलन दिल्याचे सांगत शिवीगाळ सुरू केली. तसेच पोलीस नाईक चौधरी यांना मारहाण केली. यावेळी पोलीस कर्मचारी किरण धांडे व पोलीस मित्र स्वप्नील जाधव उपस्थित होते. वाहतूक पोलिसांनी होणाऱ्या मारहाणीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलीस गणेश चौधरी यांना मारहाण व मारहाण झाल्याचा निषेध शहरातून होत आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मनोज गुरनानी व डिंकी गुरुनानी यांच्यावर गुन्हे दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Attack on Khaki! Traffic police beaten up in anger over online challan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.