कृष्णा जाधव खुन प्रकरणातील आरोपी मुलीचा हल्ल्यात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:25 PM2019-06-19T16:25:36+5:302019-06-19T17:51:11+5:30
हल्ला झालेली मुलगी कृष्णा जाधव खुन प्रकरणातील आरोपी आहे.
बारामती: रात्री साठेआठ च्या सुमारास धारदार शस्त्राने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात होता. या हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला पुण्यात ससुन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातुन हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी कृष्णा जाधव खुन प्रकरणातील आरोपी आहे.सोमवारी (दि १७ ) रात्री ही मुलगी शहरातील सांस्कृतिक भवनसमोरुन निघाली होती. यावेळी अचानक आलेल्या हल्लेखोराने कोयतासदृश्य धारदार शस्त्राने हल्ला चढविला.त्यांनतर हल्लेखोर पसार झाला.याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.पोलिसांनी तातडीने जखमी अल्पवयीन मुलीला सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी हलविले.तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सोमवारी (दि १७) रात्रीच दुचाकीवर आलेल्या संशयित हल्लेखोराचे छायाचित्र आणि वर्णन प्रसिध्द केले होते. हल्लेखोराकडे निळ्या रंगाची पल्सर आहे. या दुचाकीचा क्रमांक मोठ्या अक्षरात ८ लिहिलेला आहे. हल्लेखोराने एक निळा टी-शर्ट परिधान केला आहे.त्याची शरीरयष्टी सडसडीत आहे.त्याने कट मशीन कटिंग केली असल्याचे पोलीसांनी सोशल मीडियावर प्रसारीत केलेल्या संशयिताचे छायाचित्र प्रसारीत केले होते. पोलिसांनी मंगळवारी संशयितास ताब्यात घेतले असुन त्याच्याकडे कसुन चौकशी सुरु आहे.
याप्रकरणी तपासासाठी ३ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यापैकी एक पथक जखमी मुलीकडुन तपासकामी चौकशीसाठी ससुन रुग्णालयात थांबुन आहे. तर दुसरे पथक काल झालेल्या हल्ल्याचा सुत्रधाराच्या मागावर आहे.तर तिसरे पथक याप्रकणातील संशयितांकडे कसुन चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी ' लोेकमत ' शी बोलताना दिली.