धावत्या मेल एक्स्प्रेसमध्ये भीषण हल्ला, एक गंभीर जखमी; ४ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 08:42 PM2021-10-15T20:42:50+5:302021-10-15T20:43:18+5:30
पनवेलहून पटणा जाणाऱ्या मेल एक्सप्रेस मध्ये एका इसमावर् धारधार शस्त्राने वार केल्या प्रकरणी कसारा रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी मोट्या शिताफीने 2 जणांना अटक केली.
कसारा, शाम धुमाळ
पनवेलहून पटणा जाणाऱ्या मेल एक्सप्रेस मध्ये एका इसमावर् धारधार शस्त्राने वार केल्या प्रकरणी कसारा रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी मोट्या शिताफीने 2 जणांना अटक केली. आज संद्याकाळी पनवेल हून येणारी पटणा एक्सप्रेस मध्ये कल्याण हून 2 मुली व 3 तरुण इसम चढले ..2 मुली ह्या ट्रेन मद्ये गाणी बोलून पैसे गोळा करण्याचे काम करतात तर हे तीन जन एकमेकांच्या ओळखीचे असल्याने ते त्या मुलीं च्या मागावर प्रवास करित होते .मुली नी कल्यान सोडल्यावर आपला नित्याचा उपक्रम करित होते.गाणी बोलत प्रवशांकडून बक्षीसपात्र पैसे घेत होते..त्या मुलीच्या मागावर असलेल्या 3 तरुणां मध्ये आपापसात काही तरी वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
त्यातील एका तरुणाने सोबतच्या सोनू या तरुणावर (पूर्ण नाव समजले नाही.) धारधार शस्त्राने वार केले त्या तरुणाच्या मानेवर व हातावर गँभीर दुखपत केली या प्रकरणातील कोणाचेही नावे अजून समजली नसून टिटवाळा ते कसारा दरम्यान हा थरार सुरु होता..गाडीत रक्ताचा सडा पडला होता गाडीतील गोंधळाचा व हानामारीचा प्रकार गाडीतील टीसी यांच्या लक्षात येताच त्यांनी कसारा रेल्वे स्टेशन मास्तर, व कट्रोल रूम ला माहिती दिली..या घटनेची माहिती कसारा रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी हनुमान सिंग,गायकवाड,कर्मचारी अंगद कचव,किरण कासार ,व रेल्वे पोलिस अतुल येवले यांना मिळताच त्यांनी कसारा रेल्वे स्थानकात साफळा रचून प्रवाशाच्या मदतीने आरोपी 2 तरुणांना ताब्यात घेतले व स्थानिक तरुण व आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य रमेश आडोळे यांनी रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या सोनू नामक जखमी ला गाडी बाहेर काढून तात्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथॉमपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.या प्रकरणी कल्याण लोहमार्ग चे अधिकारी वाल्मिक शार्धूल पुढील तपास करित आहेत.