साताऱ्यात न्यायाधिशांच्या भावावर प्राणघातक हल्ला; कारण अस्पष्ट, हल्लेखोरांकडून गाडीचीही तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 01:50 PM2022-03-13T13:50:06+5:302022-03-13T13:52:19+5:30
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील शाहूनगर येथे वास्तव्यास असलेले व सध्या आंबेजोगाई येथे न्यायाधीश असलेले चंद्रमोहन खारकर यांचे मोठे बंधू अॅड.राममोहन खारकर (वय ३७) यांच्यावर शाहूनगर चौकात रात्री सव्वा दहा वाजता दहा ते बारा जणांनी गाडी अडवून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
अॅड. राममोहन खारकर हे कारमधून रात्री घरी जात होते. यावेळी दहा ते बाराजणांनी त्यांची गाडी अडवून अचानक त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या कारचीही तोडफोड केली. या प्रकारानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. अॅड. खारकर यांच्यावर खुनी हल्ला कोणी व कोणत्या कारणांसाठी केला, हे अद्याप पुढे आले नाही. जिथं हा हल्ला झाला. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सातारा शहर पोलिसांनी सुरू केले असून, लवकरच हल्लेखोर हाती लागतील, असे पोलिसांनी सांगितले.