शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

By संदीप वानखेडे | Published: June 26, 2023 05:23 PM2023-06-26T17:23:15+5:302023-06-26T17:24:13+5:30

या प्रकरणी पाेलिसांनी १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Attack on house due to agricultural dispute, crime against 13 persons | शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

डाेणगाव : शेतीच्या वादातून एकाच्या घरावर हल्ला करून घरातील साहित्याची ताेडफाेड केेल्याची घटना २५ जून राेजी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लाेणी गवळी येथील सखाराम शंकरराव काळदाते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ जून राेजी दुपारी किशोर तुळशीराम काळदाते व त्याची पत्नी अस्मिता यांच्याबराेबर शेतीवरून संताेष भांबे व त्याच्या नातेवाईकांनी वाद घातला. काळदाते यांनी या वादाची माहिती डाेणगाव पाेलिसांना दिली हाेती. 

दुपारी याच कारणावरून संतोष यादव भांबे, आकाश मधुकर भांबे, दीपक मधुकर भांबे, रामा मधुकर भांबे, प्रवीण महादेव काळदाते महादेव धोंडूजी काळदाते, रामा भांबे याचा सासरा हेलगुडे रा. मोळा, रत्नमाला संतोष भांबे, बेली काळदाते, रंजना मधुकर भांबे, रंजना महादेव काळदाते, रुचा दीपक भांबे, सिमा आकाश मांबे सर्व रा. लोणी गवळी यांनी काळदाते यांच्या घरावर हल्ला केला.

घरात असलेले सखाराम काळदाते व त्यांची पत्नीच घरी हाेते. ते घाबरून गच्चीवर गेले. आराेपींनी घरात शाेधाशाेध सुरू केली असता कुणीही सापडले नाही. त्यामुळे, त्यांनी घरातील टीव्ही, एसी, कपाट, खिडकीच्या काचा फाेडल्या़ तसेच घरासमाेर उभी असलेल्या तेजराव खंडारे यांच्या स्कुटीचीही ताेडफाेड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Attack on house due to agricultural dispute, crime against 13 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.