रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन एकावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:25 PM2019-05-13T15:25:41+5:302019-05-13T15:27:44+5:30
रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन तसेच पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
पिंपरी : रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन तसेच पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन तिघांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीतील भाजी मार्केटजवळील चौकात घडली.अक्षय उर्फ टकल्या सुदाम गायकवाड (वय २०), शुभम बाळु खरात (वय २१, दोघेही रा. संजय गांधीनगर, मोशी) यांना अटक केली असून इस्तीयाक खान हा फरार आहे. याप्रकरणी विशाल विश्वनाथ शिनगारे (वय २८, रा. गणपती मंदीराजवळ, बोराटे वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम असे या हल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या हल्ल्यात जखमी झालेला शुभम हा फिर्यादी विशाल शिनगारे यांचा भाचा आहे. रिक्षा हळू चालविल्याच्या कारणावरुन तसेच पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी इस्तीयाक खान याने मोशी भाजी मार्केटजवळील चौकात रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शुभम याच्यावर कोयत्याने वार केला. यामध्ये तो जखमी झाला. तसेच आरोपी गायकवाड व खरात याने शुभमच्या डोळयात मिरचीपूड टाकून त्याला पकडून ठेवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी गायकवाड व खरात याला अटक केली असून इस्तीयाक खान फरार आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.