'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'वरून शिजत होता मोठ्या अतिरेकी हल्ल्याचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:58 PM2018-12-26T19:58:49+5:302018-12-26T19:59:36+5:30
या अतिरेक्यांनी ऐकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'चा वापर केला अशी माहिती एनआयचे आयजी अलोक मित्तल यांनी दिली.
नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली आहे. या अतिरेक्यांनी ऐकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'चा वापर केला अशी माहिती एनआयचे आयजी अलोक मित्तल यांनी दिली.
या अतिरेक्यांकडून 7.5 लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल 100 मोबाईल फोन्स आणि 135 सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे", अशी माहिती अलोक मित्तल यांनी पुढे दिली. हे अतिरेकी व्हाॅट्सअॅप आणि टेलीग्राम या अॅपच्या माध्यमातून ऐकमेकांच्या संपर्कात होते", असे पुढे मित्तल यांनी सांगितले. मित्तल पुढे म्हणाले की, अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि देशी रॉकेट लॉन्चर्स जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 1 देशी राॅकेट लाॅन्चर, 12 देशी बनावटीच्या बंदुका आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडला. त्यांचा आत्मघातकी हल्ल्याचाही कट होता आणि आयएसआय (ISI) या दहशतवादी संघटनेसारखं मोड्युल या अतिरेक्यांनी विकसित केलं होतं.
ISIS कनेक्शन? NIAकडून गँगस्टर 'हाफिज'ला अटक