पूर्व वैमनस्यातून पिंपरी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 07:27 PM2019-03-08T19:27:46+5:302019-03-08T19:28:21+5:30
पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी वराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोक्यात व पाठीत कोयत्याने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले.
पिंपरी : पूर्व वैमनस्यातून चौघांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना ताथवडे येथे बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. सौरभ पवार, बंटी पवार, कुणाल गराडे, सुरज शेळके अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आशुतोष उर्फ सोन्या संतोष वराडे (वय १८, रा. गोंधळेवाडा, गावडे भोईर आळी, चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडे हे ताथवडे चौकातील बालाजी कॉलेज परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पाणीपुरी खात उभे होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी वराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोक्यात व पाठीत कोयत्याने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.