अखेर संजय कुटेंनी जळगाव-जामोदचा रस्ता धरला, ठिय्या आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:21 PM2021-04-19T20:21:17+5:302021-04-19T20:23:18+5:30

Attempt to attack on MLA Sanjay Kutten's vehicle : दोषांवर कारवाई होईस्तोवर बुलडाणा सोडणार नाही- कुटे

Attempt to attack on former minister and MLA Sanjay Kutten's vehicle | अखेर संजय कुटेंनी जळगाव-जामोदचा रस्ता धरला, ठिय्या आंदोलन मागे

अखेर संजय कुटेंनी जळगाव-जामोदचा रस्ता धरला, ठिय्या आंदोलन मागे

Next
ठळक मुद्दे दुसरीकडे माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय कुटे यांच्या वाहनावरील कथितस्तरावरील दगडफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुलडाणा शहरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते.

बुलडाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद १९ एप्रिल रोजी बुलडाण्यात उमटले. संपूर्ण प्रकाराचा निषेध करून बुलडाण्यातून परत जात असतना काही अज्ञातांनी माजी मंत्री तथा आ. संजय कुटे यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे नमते घेतलेल्या माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी जो पर्यंत दोषिंवर कारवाई होत नाही, तोवर बुलडाणा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या मलकापूर नाक्यापासून जवळपास दीड किलोमीटर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत भाजप कार्यकर्ते व आ. श्वेता महाले, माजी आ. विजयराज शिंदे यांच्यासह पायी येत त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या दिला. दरम्यान त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यासाठी आमदार द्वय आणि माजी आ. विजयराज शिंदे गेले होते. मात्र जो पर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोवर बुलडाणा सोडणार नसल्याची आपली भूमिका ठाम असल्याचे आ. कुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दुसरीकडे माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय कुटे यांच्या वाहनावरील कथितस्तरावरील दगडफेक आणि हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर बुलडाणा शहरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते. भाजपचे आमदार द्वय डॉ. कुटे आणि श्वेता महाले यांनी पुन्हा बुलडाण्यात येण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्वत: जुना मलकापूर नाका काठून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. कुटे हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तर दोन आमदारांनाही पोलिस संरक्षण देऊ शकत नाही, या बद्दल आ. श्वेता महाले यांनी एसपीकडे खेद व्यक्त केला. यावेळी घोषणाबाजी करत त्यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. सायंकाळी सात वाजेत पर्यंत पोलिस अधीक्षकांच्या दालनात आमदरा कुटे, श्वेता महाले, माजी. आ. विजयराज शिंदे यांच्या पोलिस अधीक्षकांशी चर्चा सुरू होती. मात्र चर्चा कुठल्याही निर्णयाप्रत आली नव्हती.

आ. कुटे जळगावकडे रवाना
आ. कुटे यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतर आ. संजय कुटे यांनी बुलडाण्यातील त्यांच्या ठिय्या आंदोलनाचा निर्णय मागे घेतले आहे. सोबतच सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास त्यांनी जळगाव जामोदचा रस्ता धरला. दरम्यान एक दिवसात आक्षेपार्ह्य विधान तथा वाहनावर हल्ला प्रकरणात कारवाई न झाल्यास पुन्हा भाजपतर्फे जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पाच ते सात जणांना सायंकाळी अटक केली असल्याची माहिती आहे. त्यानंतर आ. कुटे यांनी त्यांची आक्रमक भुमिका बदलली. आणि जळगाव जामोदकडे रवाना झाले आहेत.

Web Title: Attempt to attack on former minister and MLA Sanjay Kutten's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.