दागिने असलेली बॅग चोरणारा अटकेत, कल्याणमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:21 AM2019-06-27T01:21:39+5:302019-06-27T01:21:52+5:30
जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून वसई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन लाख ६० हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढणाºया चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रविवारी कल्याण स्थानकात रंगेहाथ पकडले.
डोंबिवली : जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून वसई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन लाख ६० हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढणाºया चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रविवारी कल्याण स्थानकात रंगेहाथ पकडले.
अर्जुन राठोड (३६, रा. अमरावती) असे चोरट्याचे नाव आहे. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के म्हणाले की, ‘वाघाराम चौधरी (५२, रा. पिंपरी-चिंचवड) हे रविवारी वसई ते पुणेदरम्यान जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून प्रवास करत होते. गाडी कल्याण स्थानकात आली तेव्हा चौधरी हे त्यांच्या पत्नीसमवेत जनरल डब्यात बसले होते. त्यावेळी राठोड याने चौधरी यांचीदागिने असलेली बॅग घेऊन गाडीतून उतरून फलाटातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आराडाओरडा झाल्याने तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील बॅग तक्रारदाराची असल्याची स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल केला. कल्याण रेल्वे न्यायालयाने आरोपीला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
चोऱ्यांमुळे प्रवासी हैराण
रेल्वे प्रवासादरम्या होणाºया चोºयांमुळे प्रवासी हैराण झाले असून प्रवास करताना भीतीच्या छायेत राहत आहेत.
प्रवासादरम्यान होणाºया चोºयांवर रेल्वे पोलिसांनी
त्वरित नियंत्रण मिळवावे, अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.