अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:12 AM2021-06-21T11:12:15+5:302021-06-21T11:12:40+5:30

Attempt to burn alive by throwing petrol on the body : या घटनेत  संदीप बाबूराव निकाळजे हा जखमी झाला आहे.

Attempt to burn alive by throwing petrol on the body | अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
किनगाव राजा : स्थानिक बसस्टॉपनजीक मद्य पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.
ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेत  संदीप बाबूराव निकाळजे हा जखमी झाला आहे. प्रकरणी पोलिसांनी जखमी संदीप निकाळजे याच्या आईच्या तक्रारीवरून विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोपाळ रामभाऊ उबाळे (रा. किनगाव राजा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल  करीत त्यांना अटक केली आहे.
जखमी संदीप बाबूराव निकाळजे आणि आरोपी विजय श्रीराम मुंढे, किरण ऊर्फ गोकुळ रामभाऊ उबाळे हे किनगाव राजा येथे सोबत मद्यपान करीत होते. त्यातच त्यांच्यात वाद होऊन तो विकोपाला गेला. त्यातच विजय मुंढे आणि गोकुळ उबाळे या दोघांनी संदीप निकाळजे याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.  
त्यात त्यामुळे संदीपच्या अंगावरील टी-शर्ट पेटून त्याच्या दोन्ही हातांना, पोटाला, छातीवर, चेहऱ्यावर तसेच कानाला भाजल्यामुळे जखमा झाल्या आहेत.
संदीप निकाळजे याची आई सत्यभामा बाबूराव निकाळजे (५०) यांनी या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 
त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे, हेड कॉन्स्टेबल राजू दराडे, गजानन सानप, रोशन परशुवाले, जाकेर चौधरी, जाकेर पठाण हे करीत आहेत. या घटनेत संदीप निकाळजे हा १० ते १५ टक्के भाजला असल्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले. एकंदरीत घटनाक्रम व घटनेचे गांभिर्य पाहता याप्रकरणात तातडीने पावले उचलून आरोपींनाही अटक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Attempt to burn alive by throwing petrol on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.