खळबळजनक! राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
By पूनम अपराज | Published: October 5, 2020 07:53 PM2020-10-05T19:53:02+5:302020-10-05T19:53:41+5:30
Suicide Attempt : पोलिसांनी त्यांना तात्काळ रोखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.
जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालन्यातील आढावा बैठकीदरम्यान आज एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विलास आठवले असं या शेतकऱ्याचं नाव असून तो सेवली येथील रहिवासी आहे.
SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप
सेवली परिसरात आठवले यांची जमीन आहे. या जमिनीवर काही लोकांनी आपला हक्क सांगून बळकावली असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील या संदर्भात कारवाई होत नसल्यानं निवेदन देण्यासाठी आठवले जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले होते. या दरम्यान टोपे यांची आढावा बैठक सुरु असताना आठवले यांनी जमिनीवरील कब्जा केल्याचा आरोप करत विषाची बाटली तोंडात ओतून विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना तात्काळ रोखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. पोलिसांनी विलास आठवले यांना उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.