पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष पिऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 19:46 IST2021-02-14T19:41:04+5:302021-02-14T19:46:27+5:30
विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष पिऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करुन एकाने शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. नवनाळ बन्सी थोरात (रा. रांजनी, ता. आंबेगाव) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मारूती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ थोरात यांच्याविरूद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात नवनाथ थोरात हे शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्याने माझ्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे त्याठिकाणी एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवनाथ थोरात यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.