शारीरिक संबंध ठेवण्यावरून झालेल्या वादात गे तरुणांमध्ये खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 09:10 PM2018-09-20T21:10:55+5:302018-09-20T21:15:10+5:30

दोघा गे तरुणांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरुन झालेल्या वादात एकाने झोपलेल्या मित्रावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़.

The attempt of killing youth in the sexual harassment controversy | शारीरिक संबंध ठेवण्यावरून झालेल्या वादात गे तरुणांमध्ये खुनाचा प्रयत्न

शारीरिक संबंध ठेवण्यावरून झालेल्या वादात गे तरुणांमध्ये खुनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देशारीरिक संबंध ठेवण्यावरून भांडण : डेटींग साईटवर झाली होती ओळख फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरु अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर

पुणे : दोघा गे तरुणांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरुन झालेल्या वादात एकाने झोपलेल्या मित्रावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. तीन वर्षांपूर्वी दोघांची गे डेटींग साईटवर ओळख झाली होती. झोपेत असलेल्या एकाच्या डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला असून खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे़ 
शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ४६ वर्षाच्या तरुणाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी पाषाण सुस रोडवर राहणाºया एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे़ सुभाषनगर येथे बुधवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणाचे दुचाकीचे शोरुम आहे़. आरोपी हा काहीही कामधंदा करत नसून त्याचा दुसरा गे मित्र त्याचा सांभाळ करतो़. या दोघांची सुमारे ३ वर्षांंपूर्वी गे डेटिंग साईटच्या माध्यमातून भेट झाली होती़. तेव्हापासून दोघेही एकमेकाबरोबर अधून मधून राहतात़. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला़. त्याच्या अगोदर दोन दिवसांपासून आरोपी फिर्यादीच्या घरी राहत होता़. दिवसभर बाहेर जाऊन आरोपी रात्री त्याच्या घरी येत होता़. मंगळवारी रात्री त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्यावरुन वाद झाला़. त्यानंतर फिर्यादी झोपले असताना आरोपीने त्याच्या डोक्यावर, उजव्या खांद्यावर कोयत्याने अनेक वार केले़ डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून चेहऱ्याच्या हाडास फ्रॅक्चर झाले आहे़.
आपण त्याला मारले नसून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने जबरदस्ती करताना तो जखमी झाल्याचे आरोपीचे म्हणणे आहे़ फिर्यादीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़. खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न  केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे़. सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड अधिक तपास करत आहेत. 

Web Title: The attempt of killing youth in the sexual harassment controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.