इंदापूर येथे मुलीच्या प्रियकराला पेटवून देत खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:59 PM2019-05-07T12:59:42+5:302019-05-07T13:01:29+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील ऑनर किलिंगचा प्रकारापाठोपाठ हा प्रकार समोर आला असून इंदापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष घोरपडेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

In an attempt to murder of the girl's lover in Indapur | इंदापूर येथे मुलीच्या प्रियकराला पेटवून देत खुनाचा प्रयत्न

इंदापूर येथे मुलीच्या प्रियकराला पेटवून देत खुनाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देतरुणाच्या जबाबातून उघड झाला प्रकार

पुणे : मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यावर तरुणाला धमकी देऊन त्याच्या अंगावर रॉकेल व पेट्रोल ओतून पेटवून देऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार इंदापूरात घडला आहे. 
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील ऑनर किलिंगचा प्रकारापाठोपाठ हा प्रकार समोर आला असून इंदापूरपोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संतोष घोरपडेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किस्मत शब्बीर शेख (वय १९, रा़ टन्नू आडोबा वस्ती, नरसिंगपूर, ता़ इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३ मे रोजी टन्नु नरसिंगपूर येथे रात्री दहा वाजता घडली होती.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किस्मत शेख याचे गावातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. हे या मुलीच्या घराच्यांना समजल्यानंतर त्यांनी ३ मे रोजी रात्री शेख याला त्यांच्या घरी बोलावून घेतले. त्याला तूू आमच्या मुलीचा नाद सोड असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष घोरपडे व इतरांनी त्याचा अंगावर रॉकेल व पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यात शेख हा भाजला असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सोलापूरमधील बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शेख याचा जबाब नोंदवून घेतला. त्यात ही बाब पुढे आल्यावर त्यांनी याची नोंद घेतली. हा सर्व प्रकार इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांनी ती तक्रार इंदापूर पोलिसांकडे पाठवून दिली. इंदापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तिघांविरुद्ध दाखल केला आहे.

Web Title: In an attempt to murder of the girl's lover in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.