ऑनलाइनच्या माध्यमातून लुटण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:30 PM2020-07-08T23:30:49+5:302020-07-08T23:33:09+5:30
लॉकडाऊनदरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. नागरिकांकडून इंटरनेटद्वारे कामे करण्याचा प्रयत्न होत असल्याची संधी सायबर गुन्हेगारांकडून साधली जात आहे.
नवी मुंबई : नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या महिलेला फसविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. परंतु वेळीच महिलेने सावधानता बाळगल्याने हा गुन्हा टळला. मात्र यानंतरही सातत्याने फोन करून संबंधितांकडून महिलेला त्रास देण्याचा प्रकार सुरू होता.
लॉकडाऊनदरम्यान ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. नागरिकांकडून इंटरनेटद्वारे कामे करण्याचा प्रयत्न होत असल्याची संधी सायबर गुन्हेगारांकडून साधली जात आहे. अशाच प्रकारातून नेरूळच्या सुवर्णा खांडगे पाटील यांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी एका संकेतस्थळावर नोकरीसाठी आॅनलाइन अर्ज भरला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना ४९ रुपये नोंदणी शुल्क भरणा करण्यासाठी सांगण्यात आले.
परंतु शुल्क भरताना एका बँकेचे कार्ड न चालल्याने त्यांनी दुसºया बँकेचे कार्ड वापरले असता, त्यांना २९ हजार रुपयांच्या व्यवहारासाठी ओटीपी आला. यामुळे शंका आल्याने त्यांनी प्रक्रिया थांबवली. त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून त्यांना सतत फोन करून ओटीपी मिळविण्यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. यावरून आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.