पोलीस ठाण्यासमोर पिडीत कुटुंबाचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:42 PM2021-09-15T18:42:42+5:302021-09-15T18:44:01+5:30
Crime News : अत्याचारी आरोपींना अटक करण्याची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल होऊनही, गेल्या दोन महिन्यांपासून अटक केली जात नाही. या निषेधार्थ पीडितांच्या कुटुंबाने उल्हासनगर पोलीस ठाण्या समोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा पर्यत बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास केला. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पीडित कुटुंबाला समजावून आश्वासन दिल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगरातील ओमी कलानी टीमचा पदाधिकारी पंकज त्रिलोखानी व रोशन माखीजा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दोन महिन्यांपूर्वी दाखल होऊनही, आरोपीला अद्याप अटक केली नाही. तसेच कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप पीडित कुटुंबाने करून उल्हासनगर पोलीस ठाण्या समोर बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पीडित कुटुंबाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यास यश आले. सहाय्यक पोलीस आयुक्त डी टी टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पीडित कुटुंबाची समजूत काढून अटक कारवाईचे आश्वासन दिले. अशी माहिती पोलीस अधिकारी कदम यांनी दिली.
दुसऱ्या एका घटनेत, गेल्या आठवड्यात उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवर रात्रीचे ९ वाजता एका १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी मित्रा सोबत बोलत उभी होती. त्यावेळी स्टेशन परिसरात राहत असलेल्या एका तरुणाने मुलीला लोखंडी हातोडीचा धाक दाखवून, शेजारील बंद रेल्वे कामगार कॉटर्स मध्ये अत्याचार केला. याप्रकाराने खळबळ उडाली असून आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. सुरवातीला न्यायालयाने १४ सप्टेंबर प्रयत्न आरोपीला पोलीस कस्टडी दिली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कस्टडीत ५ दिवसांनी वाढ केली.
शहरातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना, दोन महिन्यापूर्वी कॅम्प नं-३ येथील एका अल्पवयीन मुलीवर ओमी कलानी टीमच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अत्याचाराचा प्रकार उघड होऊन गुन्हा दाखल झाला. आरोपीवर गुन्हा दाखल होऊन दोन महिने झाल्यानांतर अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ पोलीस स्टेशन समोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न पीडित अल्पवयीन मुलीसह कुटुंबाने केल्याने, पोलीस कारभाराचे वाभाडे निघाले आहे. पोलीस राजकीय पाश्वभूमी असलेल्या आरोपींना अटक करते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.