निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:29 PM2022-03-10T20:29:10+5:302022-03-10T21:14:34+5:30

Self Immolation : राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्याने दु:खी आणि हताश होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Attempted self-immolation of SP leader frustrated by election defeat, hospitalized | निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

googlenewsNext

कानपूरमधील सपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह उर्फ ​​पिंटू यांनी गुरुवारी दुपारी विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहनासाठी आग लावताच पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्याने दु:खी आणि हताश होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एसीपी हजरतगंज अखिलेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर नगरचे ज्येष्ठ सपा नेते नरेंद्र सिंह उर्फ ​​पिंटू चारच्या सुमारास विधान भवनासमोर पोहोचले. अचानक त्यांनी स्वतःवर तेल ओतले. त्यानंतर स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान, पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 टक्के भाजल्याचं डॉक्टर बोलत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र कानपूरमध्ये सपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. रूग्णालयात जाताना ओरडत होते की भाजपने पुन्हा सरकार स्थापन केल्याने मला दु:ख झाले आहे.



विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज गुरुवारी होत होती. यादरम्यान भाजपचे पुन्हा सरकार स्थापनेचे ट्रेंड येऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यालय आणि विधानभवनाभोवती बंदोबस्त वाढवला होता. त्याचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांच्या उपस्थितीत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Attempted self-immolation of SP leader frustrated by election defeat, hospitalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.