दारूच्या नशेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न; ६० टक्के भाजल्याने मुंबईला हलविले
By अजित मांडके | Published: September 21, 2022 11:14 PM2022-09-21T23:14:08+5:302022-09-21T23:14:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून कळवा,खारेगाव येथील योगेश रोहिदास पवार (३८) यांनी आत्महत्येचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून कळवा,खारेगाव येथील योगेश रोहिदास पवार (३८) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास कळवा खारेगाव येथे घडली. या घटनेत पवार हे ६० टक्के भाजले असून त्यांना उपचारासाठी कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर स्वरूपात भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
योगेश पवार हे कळवा खारेगाव येथील तळ अधिक ५ मजली असलेल्या दी नरेश सोसायटीत भाड्याने राहत आहेत. त्या रूममध्ये मद्यप्राशन करून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले अशी माहिती मिळताच, घटनास्थळी कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच जखमी पवार (३८) यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल केल्यावर पवार हे ६० टक्के भाजल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच ते गंभीर स्वरूपात भाजले असल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.