तरुणाने छेड काढल्याने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:23 PM2020-06-08T22:23:39+5:302020-06-08T22:27:04+5:30
संशयितास अटक : फोटो व्हायरल करण्याची धमकी
जळगाव : छेड काढल्याची तक्रार पोलिसात दिली तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने फरशी पुसण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. दरम्यान, याप्रकरणी सचिन रामदास पवार (रा.अयोध्या नगर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीला सचिन पवार हा नेहमीच घरी येऊन त्रास देत होता. जबरदस्तीने छेड काढत होता. ६ जून रोजी देखील त्याने असाच प्रकार केला असता पीडित बालिकेच्या आईने त्याला जाब विचारला असता मी तुमच्या घरी येत नाही, फक्त घराकडे बघतो असे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता देखील पीडितेची आई वरच्या मजल्यावर असताना सचिन हा घरी आला. त्याची चाहूल लागताच त्या खाली आल्या असता त्याने पीडितेचा हात धरला होता. तिने धक्का देऊन त्याला लांब केले. या झटापटीत पीडितेच्या आईलाही दुखापत झाली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला बघून घेईन व तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घरात फरशी पुसण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तेथे पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. पीडितेच्या आईने फिर्याद दिली त्यानुसार सचिन पवारविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळून जाताना घेतले ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी संशयिताला अटक करण्याचे आदेश दिल्याने सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, असीम तडवी, सचिन पाटील व योगेश बारी यांच्या पथकाने अयोध्या नगर गाठले. पोलिसांना पाहून पळून जात असतानाच सचिन याला ताब्यात घेण्यात आले. रात्री त्याला अटक करण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित
उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट
चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख