महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; पतीसह सासऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 08:05 PM2019-09-03T20:05:51+5:302019-09-03T20:08:07+5:30

फिर्यादी महिला व आरोपी सासरे हे दोघेच घरात असताना कशाचा तरी बहाणा करून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होते.

Attempts to have connect with a woman in the intention of sexually ; Offense with father-in-law | महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; पतीसह सासऱ्यावर गुन्हा

महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; पतीसह सासऱ्यावर गुन्हा

Next

पिंपरी : लगट करण्याचा प्रयत्न करून विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन सासऱ्याने केले. विवाहितेने ही बाब पतीला सांगितली. माझ्या वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केले आहे, तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहात जा, असू म्हणून पतीने भांडण केले. तसेच घटस्फोटाची मागणी केली. चिखली येथे हा प्रकार घडला. ४० वर्षीय पती व ६५ वर्षीय सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी महिलेशी किरकोळ कारणावरून भांडण करून शिवीगाळ करत असत. त्यानंतर पती कामावर गेल्यानंतर फिर्यादी  महिला व आरोपी सासरे हे दोघेच घरात असताना कशाचा तरी बहाणा करून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होते. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन सासऱ्याकडून करण्यात येत होते. ही बाब महिलेने पतीला सांगितली असता, तुझ्याशी लग्न हे माझ्यासाठी केलेले नसून माझ्या वडिलांसाठी केले आहे. तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहत जा, असे म्हणून पती व सासरे यांनी संगनमत करून फिर्यादी महिलेस माहेरी पाठवून दिले. तसेच नोटीस पाठवून घटस्फोटाची मागणी करीत आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Attempts to have connect with a woman in the intention of sexually ; Offense with father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.