पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं!

By पूनम अपराज | Published: November 7, 2020 08:18 PM2020-11-07T20:18:41+5:302020-11-07T20:19:19+5:30

Accident : जयपूरच्या सोडाला येथील एलिव्हेटेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी सकाळी  एका ऑडी क्यू७ कारने कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या तरूणाला धडक दिली.

Audi blows up youth going for police recruitment, police release without FIR! | पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं!

पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं!

Next
ठळक मुद्देराजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 

राजस्थानच्या जयपूर येथे भीषण अपघातात एका युवकाचा ऑडी कारच्या धडकेत मृत्यू झाला. जयपूरच्या सोडाला येथे हा अपघात झाला. कॉन्स्टेबल भरतीला जात असलेल्या एका युवकाला शुक्रवारी सकाळी ऑडी क्यू७ वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी गंभीर होती की, तो तरुण घराच्या छतावर पडला आणि त्याचा पाय तुडला गेला. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ऑडी कारचालक मुलीला पोलिसांनी सोडले आहे. विशेष म्हणजे ऑडी कारचालकावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. ऑडी क्यू७ या आलिशान कारच्या अपघात प्रकरणात जयपूर पोलिसांनी आरोपीला एफआयआर न करता घरी जाण्यास परवानगी दिली आहे. 

आरोपी नेहा सोनी हिला शुक्रवारी तिच्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशन सोडण्याची मुभा देण्यात आली. याप्रकरणी एफआयआर नोंदविल्याशिवाय जयपूर पोलिसांनी सोनीला घरी परत जाण्याची परवानगी दिली. तपास अधिकारी (आयओ) रघुनंदन यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मृत युवकाचा नातेवाईक राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून अद्याप पोहोचलेला नाही. जयपूरला आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाईल, असे आयओने सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदविल्याशिवाय आरोपीला कसे सोडण्याची परवानगी दिली, या प्रश्नाला उत्तर देताना आयओ रघुनंदन संतापले आणि त्यांनी स्वतः पोलिस स्टेशनमधून काढता पाय घेतला. आपली उपस्थिती दुसर्‍या ठिकाणी आवश्यक होती असा त्यांनी त्यावेळी दावा केला. जयपूरच्या सोडाला येथील एलिव्हेटेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी सकाळी  एका ऑडी क्यू७ कारने कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या तरूणाला धडक दिली. उपलब्ध माहितीवरून असे दिसते की, कार वेगाने चालविली जात होती. अपघाताच्या वेळी कारमध्ये नेहा सोनीसह दोन मुली उपस्थित होत्या.

या कार धडकेने युवक घराच्या छतावर फेकल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्याचा पाय तुडला आणि इतर जखमांमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 

Web Title: Audi blows up youth going for police recruitment, police release without FIR!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.