अगुस्ता वेस्टलँड प्रकरण : व्यापारी श्रवण गुप्ता यांच्यासह सहा जणांच्या घरांवर ईडीची छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 03:20 PM2020-06-25T15:20:40+5:302020-06-25T15:22:32+5:30
ईडीने २०१८ साली श्रवण गुप्ताची 10.28 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. श्रवण गुप्ता यांच्यावर स्विस बँकेत अघोषित ठेवी जमा केल्याचा आरोप होता.
अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्यापारी श्रवण गुप्ता यांच्यासह सहा जणांच्या घरांवर छापा टाकला आहे. ही माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली, श्रवण गुप्ता हे रिअल इस्टेट कंपनी इमार एमजीएफचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.
श्रवण गुप्ता यांच्या घराची झाडझडती घेण्यात आली, जेणेकरुन ३३२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल कोणते ना कोणते पुरावे सापडतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत हे पाऊल उचलले आहे. छापेमारी दरम्यान, गुप्ता व त्यांच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. २०१६ मध्ये त्यांच्याकडे याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आले होते.
सध्या श्रवण गुप्ता इमार एमजीएफ या रिअल इस्टेट कंपनीचा प्रवर्तक आहे. इमार कंपनीच्यावतीने जबाब नोंदविण्यात आला आहे. सध्या श्रवण गुप्ता कंपनीच्या कोणत्याही भूमिकेत नाहीत. जबाबत म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी इमार आणि एमजीएफ वेगळे झाले होते आणि श्रवण गुप्ता यांची इमार इंडियामध्ये कोणतीही भूमिका नाही.
जबाबात अशी माहिती देण्यात आली आहे की, सध्या इमार इंडिया दुबईच्या तिमार प्रॉपर्टीज पीजेएससी अंतर्गत येते. कंपनीने आपल्या जबाबत एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी असल्याने इमार इंडिया भारत सरकारला पूर्ण सहकार्य करेल, असे म्हटले आहे. अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, लाचखोरीची रक्कम भारतात आणण्यात सर्वात मोठा हात असलेल्या युरोपियन गुइडो हेचके यांच्याशी श्रवण गुप्ता यांचे संबंध आहेत. २००९ साली गुइडो इमार-एमजीएफमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. ईडीने अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीवर पैशांची उधळपट्टी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने २०१८ साली श्रवण गुप्ताची 10.28 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. श्रवण गुप्ता यांच्यावर स्विस बँकेत अघोषित ठेवी जमा केल्याचा आरोप होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता
Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई
लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार
विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात