खूनी वधू! लग्नाच्या १५ व्या दिवशीच पतीची हत्या; आहेराच्या पैशातून बोलावले शूटर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:32 IST2025-03-25T10:32:12+5:302025-03-25T10:32:46+5:30
दिलीप नावाच्या एका तरुणाची त्याच्या लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांत हत्या करण्यात आली. ही हत्या दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून केली होती.

खूनी वधू! लग्नाच्या १५ व्या दिवशीच पतीची हत्या; आहेराच्या पैशातून बोलावले शूटर्स
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात दिलीप नावाच्या एका तरुणाची त्याच्या लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांत हत्या करण्यात आली. ही हत्या दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून केली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.
५ मार्च २०२५ रोजी प्रगतीचं उद्योगपती दिलीपशी लग्न झालं. पण प्रगतीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं. अनुराग असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. दोघंही गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रगतीला कोणत्याही किंमतीत अनुराग हवा होता.तर दुसरीकडे अनुराग देखील प्रगतीसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. अशा परिस्थितीत प्रगतीने पतीला संपवण्यासाठी एक भयंकर कट रचला.
मैनपुरी येथील व्यावसायिक दिलीप (२४) याचं लग्न औरैया येथील फाफुंड येथील रहिवासी प्रगतीशी झालं. लग्नाच्या १५ दिवसांनी १९ मार्च रोजी दिलीपवर गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासात गुंतलेल्या पोलिसांनी सोमवारी एक खळबळजनक खुलासा केला. पोलिसांनी सांगितलं की, पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून या हत्येचा कट रचला होता.
सूनमुख आणि इतर विधींदरम्यान प्रगतीला मिळालेले पैसे तिने शूटर्सना दिल्याचं सांगितलं जात आहे. गोळीबार करणाऱ्याला एकूण २ लाख रुपये देण्यात आले. प्रगतीने अनुरागला पैसे दिले, नंतर अनुरागने ते शूटरला दिले. पोलिसांनी आरोपी पत्नी, तिचा बॉयफ्रेंड अनुराग आणि एका शूटरला अटक केली आहे.
पोलीस चौकशीदरम्यान प्रगतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. प्रगतीचा बॉयफ्रेंड अनुराग यादव त्याच गावचा रहिवासी होता आणि दोघांचेही प्रेमसंबंध होते, असं तपासात समोर आलं. कुटुंबाचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे प्रगती अनुरागशी लग्न करू शकली नाही. लग्नानंतरही प्रगती अनुरागच्या प्रेमात वेडी होती. याच कारणामुळे तिने तिच्या पतीला संपवण्यासाठी अनुरागसोबत हत्येचा कट रचला.
प्रगतीने तिच्या पतीला मारण्यासाठी अनुरागला १ लाख रुपये दिले, त्यानंतर अनुरागने त्याचा साथीदार रामजी नागरसोबत मिळून २ लाख रुपयांचा सौदा केला. १९ मार्च रोजी प्रगतीचा पती कन्नौजहून परत येत असताना, आरोपींनी त्याला कालव्याजवळील एका हॉटेलमध्ये थांबवलं आणि नंतर बाईकवरून एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याची हत्या केली.