भयानक! बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं, पैशासाठी दिलीपशी केलं लग्न; 'खूनी' पत्नीचा 'खतरनाक' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:42 IST2025-03-26T15:41:50+5:302025-03-26T15:42:31+5:30
दिलीपची पत्नी प्रगती हिने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच पतीची हत्या केली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात व्यापारी दिलीप यादव याच्या हत्येने लोकांना धक्का बसला आहे. दिलीपची पत्नी प्रगती हिने लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच पतीची हत्या केली. चौकशीदरम्यान प्रगतीला तिचा बॉयफ्रेंड अनुरागशी लग्न करायचं असल्याचं समोर आलं आहे. पण कुटुंबाच्या दबावाखाली तिने दिलीपसोबत सप्तपदी घेतल्या. लग्नानंतर तिने भयंकर प्लॅन रचला. अनुराग आणि त्याच्या मित्रांना या प्लॅनमध्ये सामील केलं, त्यांना सुपारी देऊन पतीची हत्या केली.
प्रगती आणि अनुराग यांचं अफेअर होतं, दोन्ही कुटुंबांनाही याची माहिती होती. पण त्यांनी प्रगतीचं लग्न जबरदस्तीने मैनपुरीच्या दिलीपशी लावलं. प्रगतीने लग्नानंतर दिलीपला आपल्या मार्गातून काढून टाकण्याचा आणि नंतर अनुरागशी लग्न करण्याचा प्लॅन केला. अनुराग गरीब होता तर दिलीप एका श्रीमंत कुटुंबातील होता. प्रगतीला त्याचे पैसे हडप करायचे होते. प्रगतीच्या मनात होतं की, ती दिलीपच्या पैशाने अनुरागसोबत चांगले आयुष्य जगेल. पण घटनेच्या काही दिवसांनी रहस्य उघड झालं.
पोलिसांनी प्रगती, अनुराग आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दिलीपच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की त्याची 'खूनी' पत्नी प्रगतीला सर्वात कठोर शिक्षा देण्यात यावी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी दिलीप शेतात जखमी अवस्थेत आढळला होता. २१ मार्च रोजी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
दिलीपच्या हत्येसाठी प्रगती आणि अनुरागने रामजी चौधरीला २ लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिलीपला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. प्रगती आणि दिलीप यांचं लग्न ५ मार्च रोजी झालं होतं. १९ मार्च रोजी दिलीप वर गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून दिलीपची हत्या केल्याचं तपासात उघड झालं.