एटीएममधून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने रिक्षा पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:21 PM2019-03-25T17:21:59+5:302019-03-25T17:24:05+5:30
वाकड येथील हॉटेल सहारा येथे जेवायला जाण्यासाठी रिक्षा भाडेतत्वावर घेतली.
पिंपरी : एटीएम मधून पैसे आणून देण्याच्या बहाण्याने रिक्षा पळवून नेणारयाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना वाकड येथे रविवारी मध्यरात्री घडली.
नवनाथ हनुमंत शितोळे (वय २८, रा. देवकर चाळ, बोपखेल) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बालाजी विनायक मोगली (वय १९, रा. लांडगेनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी हे गुरुवारी मध्यरात्री रिक्षा व्यवसाय करण्यासाठी थांबले असताना आरोपी शितोळे त्याठिकाणी आला. वाकड येथील हॉटेल सहारा येथे जेवायला जाण्यासाठी रिक्षा भाडेतत्वावर घेतली. त्यानंतर जेवणाचे बिल देण्यासाठी जवळ पैसे नसल्याचा बहाणा करुन एटीएम मधून पैसे आणतो असे सांगून शितोळे रिक्षा घेवून गेला. मात्र, परत रिक्षा आणून न देता बालाजी यांची फसवणूक केली. याबाबत बालाजी यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत शितोळे याला जेरबंद केले.