अनुराधा पौडवाल यांना गंडा घालणारा मुख्य आरोपी अविनाश ढोलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 23:49 IST2018-09-27T23:49:27+5:302018-09-27T23:49:58+5:30
अर्नाळा पोलिसांनी अनुराधा पौडवाल यांच्या तक्रारीनंतर फरार आरोपीला ठोकल्या बेडया

अनुराधा पौडवाल यांना गंडा घालणारा मुख्य आरोपी अविनाश ढोलेला अटक
विरार - विरारमधील गृहप्रकल्प घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अविनशा ढोले याला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसिध्द पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक नागरिकांना गृहप्रकल्पात स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात पौडवाल यांनी तक्रार देताच पोलिसांनी कारवाई करून फरार असलेल्या आरोपी ढोले याला अटक केली आहे.