भयंकर! मुंबईत पोलिसानं तरुणाच्या डोळ्यावर मारली लोखंडी वस्तू, चष्म्याच्या काचा घुसल्या आरपार

By पूनम अपराज | Published: February 19, 2022 05:05 PM2022-02-19T17:05:29+5:302022-02-19T17:11:41+5:30

Assaulted by Police : याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात वैभवचा चुलत भाऊ रोहन आणि पोलीस कर्मचारी सुमित गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Awful! In Mumbai, a young man was hit in the eye by a policeman with an iron object and a pair of spectacles inserted into eye | भयंकर! मुंबईत पोलिसानं तरुणाच्या डोळ्यावर मारली लोखंडी वस्तू, चष्म्याच्या काचा घुसल्या आरपार

भयंकर! मुंबईत पोलिसानं तरुणाच्या डोळ्यावर मारली लोखंडी वस्तू, चष्म्याच्या काचा घुसल्या आरपार

Next

पूनम अपराज 

मुंबई - दादर येथील शिवाजी पार्क परिसरात अतिशय भयंकर घटना घडली आहे. खाकीला वर्दीला लाजवणारी घटना एका पोलिसाने घडवून आणली आहे. शिवाजी पार्क येथील कॅटरिंग कॉलेजसमोर असलेल्या रतिलाल गिरीधर हाऊस येथे राहणाऱ्या वैभव ठाकूर (३६) या तरुणाला पोलीस कर्मचारी सुमित गायकवाड याने लोखंडी वस्तू उजव्या डोळ्यावर मारली. त्यानंतर वैभवचा चष्म्याच्या काचा उजव्या डोळ्यात आरपार गेल्याने डोळा रक्तबंबाळ झाला. या डोळ्याची अवस्था इतकी गंभीर झाली आहे की डोळा निकामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात वैभवचा चुलत भाऊ रोहन आणि पोलीस कर्मचारी सुमित गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी वैभव हा बँकेत कामानिमित्त गेला होता. त्यानंतर अर्ध्या तासात वैभव घरी परतला. त्यावेळी वैभवच्या आईने चुलत भाऊ रोहन ठाकूर आणि त्याचा मित्र तिला शिवीगाळ करून रागाने बघत असल्याची तक्रार केली. त्यावर वैभवच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजच्या ठिकाणी रोहन उभा होता. त्याला वैभवने माझ्या आईकडे रागाने का बघत आहेस आणि तिला शिवीगाळ का करीत आहेस. तसेच आईवर दबाव का आणीत आहेस असा जाब विचारला. त्यावेळी रोहन वैभवला पाठीमागून मिठी मारून घट्ट पकडले आणि त्याचा मित्र सुमित गायकवाडने हातातील लोखंडी वस्तूने उजव्या डोळ्यावर प्रहार केला. वैभवच्या डोळ्यावरील चष्मा फुटून त्याच्या काचा उजव्या डोळ्यात आरपार गेल्या. रक्तबंबाळ डोळा घेऊन वैभवने शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठलं. मात्र, तिथे भेटलेल्या पोलीस उपनिरीक्षक अरुण यादव यांनी त्याच्यासोबत वैद्यकीय उपचारासाठी कोणत्या पोलिसाला न पाठवता. तू डोळ्यावर उपचार करून येण्यास सांगितले. 

शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या गल्लीत बाईकस्वारांकडे वैभवने डोळ्यास वेतना होत असून हॉस्पिटलपर्यंत लिफ्ट मागितली. मात्र, एका वयस्कर इसमाने वैभवला लिफ्ट दिली आणि पोर्तुगीज चर्चनजीक असलेल्या जैन हेल्थ सेंटरला सोडले. डोळ्याला जबर मार लागल्याने जैन हेल्थ सेंटरमधून प्रथमोचार देऊन डॉक्टरांनी परळ येथील बच्चूअली चॅरिटेबल रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून एक ऑपरेशन केले. डॉक्टरांनी डोळ्याच्या बुबुळात काचा गेल्याने आणि जबर मार लागल्याने फ्रॅक्चर असल्याचे सांगितले असल्याची माहिती तक्रारदार वैभव ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना दिली. अजून चार ते पाच सर्जरी करायला लागणार असून डोळ्याने दिसेल की नाही याबाबत खात्री नाही, डोळा निकामी होण्याची शक्यता असल्याचं पुढे वैभव यांनी सांगितले. 

Maharashtra New DGP : राज्याच्या पोलीस दलाला मिळाले नवे बॉस, रजनीश सेठ यांची नियुक्ती

घरकुलासाठीच्या हप्त्यासाठी केली पैशाची मागणी, ९ हजारांची लाच घेणाऱ्या अभियांत्रिकी सहाय्यकास पकडले

 

शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी भादंवि कलम ३२४, ३३७, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. यावर संतप्त झालेल्या वैभव यांची आई यांनी लोकमतशी बोलताना खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणतात की, जर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थ्या हातात घेऊन त्याचे तीन तेरा वाजवले तर आम्ही सुरक्षित कसे राहणार. मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला न्याय देण्याऐवजी पोलीस माझ्या मुलावर दबाव आणत आहेत. महत्वाचं गुन्हा घडला १४ फेब्रुवारीला आणि ५ दिवसांनी पोलीस घटनास्थळी पाहणी करण्यास आले. माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेने आमचे सरंक्षण करावे ही मी पोलीस आयुक्त यांना विनंती करते. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, संबंधित पोलीस विशेष शाखेत कार्यरत असून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर कोर्टाने जामिनावर त्यांची सुटका केली आहे. पुढे आम्ही योग्य ती कारवाई करू. 

Web Title: Awful! In Mumbai, a young man was hit in the eye by a policeman with an iron object and a pair of spectacles inserted into eye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.