भयंकर! २५ लाखांची पोटगी वाचविण्यासाठी पोलिसानं 'लिव्ह इन पार्टनर'ला ठार मारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:39 PM2021-07-26T18:39:43+5:302021-07-26T18:40:39+5:30

Murder Case :आरोपीच्या कबुली जबाबानुसार, पटेल हिचा लग्न करण्याचा दबाव संपविणे हे देसाईंचे उद्दीष्ट असल्याचे रविवारी तपास यंत्रणांनी तपासात उघड केले. 

Awful! Police kill 'live in partner' to save Rs 25 lakh alimony | भयंकर! २५ लाखांची पोटगी वाचविण्यासाठी पोलिसानं 'लिव्ह इन पार्टनर'ला ठार मारलं

भयंकर! २५ लाखांची पोटगी वाचविण्यासाठी पोलिसानं 'लिव्ह इन पार्टनर'ला ठार मारलं

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१७ मध्ये जेव्हा आपल्या समाजातील एका महिलेशी देसाई याचे लग्न झाले, तेव्हा देसाई आधीपासूनच स्वीटी पटेल हिच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते," असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.

अहमदाबाद - आपल्या पत्नीला घटस्फोटासाठी २५ लाख रुपये उभे करण्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पोलीस निरीक्षक अजय देसाई याने आपल्या लिव्ह इन पार्टनर स्वीटी पटेलची हत्या केली. आरोपीच्या कबुली जबाबानुसार, पटेल हिचा लग्न करण्याचा दबाव संपविणे हे देसाईंचे उद्दीष्ट असल्याचे रविवारी तपास यंत्रणांनी तपासात उघड केले. 

 

पटेल हिच्या इच्छेनुसार वागण्यास आपण तयार नसल्याने तसेच आर्थिक फटका टाळायचा असल्याने तिची हत्या केल्याचे पोलीस अधिकारी देसाई यांनी तपास यंत्रणांना सांगितले. २०१७ मध्ये जेव्हा आपल्या समाजातील एका महिलेशी देसाई याचे लग्न झाले, तेव्हा देसाई आधीपासूनच स्वीटी पटेल हिच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते," असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. "आरोपी पोलिसाने पटेल हिला आपल्या पत्नीपासून विभक्त होतील असे वचन दिले होते. 


देसाई याने आपल्या समाजातील महिलेशी लग्न केल्यानंतरही ते पटेल हिच्याकडेच राहिले. देसाईचे म्हणणे आहे की, ते २०१७ मध्ये पटेल हिच्यासमवेत मंदिरात राहिले. पण लग्न कायदेशीर असावे अशी पटेलची इच्छा होती. "देसाई पुढे म्हणाला की, त्याने पटेल हिला त्यांच्या समाजातील महिलेला घटस्फोट देण्याचा सर्व खर्च सांगितला, असे देसाई याने कबुली जबाबात पोलिसांना सांगितले. 


‘प्रथम तिला हत्येसाठी अटाली गावी नेण्याचे ठरवले’

या नेहमीच्या कटकटीवरून देसाई आणि पटेल यांच्यात भांडणे सुरू झाली आणि नंतर भांडणं दिवसेंदिवस विकोपाला गेली. "पटेल हिने देसाई याला आपल्या आयुष्यातील दोन स्त्रियांपैकी एकीला सोडून दे अथवा ठार मारण्यास सांगितले. त्यानंतर देसाई याने पटेल हिला संपवण्याचा निर्णय घेतला.  सुमारे चार महिने देसाईने तिच्या हत्येचा कट रचला,” असे चौकशीत पुढे आले. "४ जून रोजी त्यांच्यात आणखी एक वाद झाला आणि त्याने तिला ठार मारण्यासाठी ती निवडली." देसाई याने सुरुवातीला दहेज जवळील अटाली गावात हॉटेलमध्ये तिला घेऊन जाण्याचा कट रचला आणि तेथेच त्याने तिला ठार मारले. पण ४ जूनच्या रात्री झालेल्या भांडणाने त्याला इतका राग आला त्याने तिचा गळा दाबला. त्याने त्याचा मित्र किरीट सिंह जडेजा याच्या हॉटेलमधील मृतदेहाची विल्हेवाट लावली. ५ जून रोजी पटेल बेपत्ता झाली होती.त्यानंतर पोलीस चौकशी सुरू झाली आणि शेवटी गुन्हे शाखेने आणि एटीएसने हे प्रकरण ताब्यात घेतले आणि देसाई याला बेड्या ठोकल्या. 

Web Title: Awful! Police kill 'live in partner' to save Rs 25 lakh alimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.