लाॅकडाऊनने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड; ऑटोचालकाची गळफास लावून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:22 PM2021-06-04T18:22:32+5:302021-06-04T18:28:05+5:30

Suicide Case : रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या चापडोह येथे ऑटो चालकाने गळफास लावून आत्महत्या केली.

The axe of unemployment collapsed by the lockdown; Auto driver commits suicide by strangulation | लाॅकडाऊनने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड; ऑटोचालकाची गळफास लावून आत्महत्या

लाॅकडाऊनने कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड; ऑटोचालकाची गळफास लावून आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देनंदकुमार तानबाजी फुलुके (२७) असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे. राजू तानबाजी फुलुके याच्या फिर्यादीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

यवतमाळ - कोरोना महामारी थांबविण्यासाठी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यात दोन वर्षापासून ऑटो चालकांचा व्यवसायच बुडाला आहे. रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या चापडोह येथे ऑटो चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. 


नंदकुमार तानबाजी फुलुके (२७) असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे. नंदकुमार याच्याकडे स्वत:चा परवानाधारक ऑटो आहे. तो कुटुंबापासून वेगळा राहत होता.  लाॅकडाऊनमुळे त्याच्या हातचा रोजगार बुडाला. त्याच्याकडे शेती असूनही ती पेरण्यासाठी यंदा पैसा नसल्याने तो आणखीच विवंचनेत होता. यातून नैराश्यात गेलेल्या नंदकुमारने घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या भावाच्या निदर्शनास आला. त्याने याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. राजू तानबाजी फुलुके याच्या फिर्यादीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

Web Title: The axe of unemployment collapsed by the lockdown; Auto driver commits suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.